बिहारच्या दरभंगा येथे भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा
पाटणा: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान बिहारमधील दरभंगा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या दिवंगत आईला उद्देशून शिवीगाळ झाल्याचे तीव्र पडसाद येथे उमटले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिहार प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले. दरम्यान, राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेऊन, ‘सत्यमेव जयते’ या प्रतिक्रियेद्वारे प्रत्युत्तर दिले.काँग्रेसच्या मतदार अधिकार…
