अवघे गर्जे पंढरपूर
चला हो पंढरी जाऊ ।जिवाच्या जिवलगा पाहू ।।असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारकर्यांची ही वारी सलग दुसर्यांदा चुकली आहे. ‘चुकलिया…
