मुंबई/ ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या ९४ वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.
शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने कांग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.

