मुंबई, : “लोकार्पण सोहळा.. संकल्प जनकल्याणाचा..” या घोषणेखाली शिवसेना उपनेते व आमदार श्री. मनोज जामसुतकर यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब आंबेडकर मार्ग, पेनिनसुला (सेल्सेट २७) येथील नवनिर्मित ‘दिवंगत कै. शरद (आप्पा) केशव पवार उद्यान (नियोजित)’ आणि करमणूक केंद्राचे भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक-२०८ चे नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) वतीने साकार झालेले हे उद्यान स्थानिक नागरिकांसाठी एक मोठा वरदान ठरले आहे. दिवंगत कै. शरद (आप्पा) केशव पवार यांच्या स्मृतीला समर्पित असलेल्या या उद्यानात हिरवळीने नटलेले बागकाम, मुलांसाठी खेळाची उपकरणे, वरिष्ठ नागरिकांसाठी विश्रामस्थळ, व्यायाम साधने आणि करमणूक केंद्रासह आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या उद्यानामुळे प्रभागातील २०८ क्रमांकातील हजारो कुटुंबांना व्यायाम, विश्रांती आणि सामाजिक संवादाची सोय मिळेल.

