भाईंदर/भाईंदरच्या महापौरपदावरुन मराठा एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा, या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीनं आंदोलन केलं आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांनी एकमेव अर्ज भरला असून या मीरा-भाईंदरच्या महापौरपदी पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे मराठा एकीकरण समिती आक्रमक झालीये.मीरा -भाईंदरचा महापौर हा मराठी असावा, असा आग्रह आहे. त्यामुळे तिथे मोर्चे काढण्यात आले आहेत..महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चात मोठ्या प्रमाणावर मराठी लोक गोळा झाले होते. मीरा भाईंदरमध्ये गुजराती महापौर लागल्याने मराठी माणसांची लढाई यापुढेही कायम राहील असे मराठी एकीकरण समितीने जाहीर केले. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय हा वाद पुन्हा पेटणार असून यात पुन्हा एकदा ठाकरे बंधू संपूर्ण ताकतीने उतरतील अशी शक्यता आहे.

