महाराष्ट्रात २८ ऑगस्टपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; राज्य सरकारची अधिसूचना जारी
मुंबई:महाराष्ट्रात बळजबरीने, फसवणुकीने किंवा प्रलोभनाद्वारे होणाऱ्या धर्मांतराला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम, २०२६’ ची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. हा कायदा येत्या २८ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे.या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतर केल्यास किंवा लग्नाचे आमिष दाखवून धर्म बदलल्यास ७ वर्षांपर्यंतच्या गैर-जामीनपात्र कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. अल्पवयीन, महिला किंवा SC/ST घटकांबाबत…
