केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीविरोधात आणि मतदारांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संयुक्त पुढाकाराने मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकला. या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) या महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीही सहभाग घेतला.
या मोर्चानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही चचेरे भाऊ अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आणि एकाच आंदोलनात एकत्र आल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगाचा कारभार व मतदार याद्यांमधील गोंधळावर या मोर्चानरम्यान तीव्र आक्षेप घेण्यात आला. राजकीय मतभेद बाजूला सारून ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आगामी काळातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
