महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्याकडून सांताक्रुझ-विलेपार्ले परिसरात ‘पादचारी प्रथम’ अभियानाची पाहणी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ आणि विलेपार्ले परिसरातील विविध विकासकामांची महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात एच पश्चिम विभागातील टिळक मार्ग व महात्मा गांधी मार्ग, एच पूर्व विभागातील पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग तसेच के दक्षिण विभागातील विले पार्ले…
