उत्तर प्रदेशातील लखनौ येथील प्रतिष्ठित किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी (KGMU) मधील जुनियर रेजिडेंट डॉक्टर रमीजुद्दीन याच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आहेत. ‘लव्ह जिहाद’, फसवणूक करून ब्लॅकमेल करणे आणि सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण उत्तर प्रदेशसह देशभरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या कसून चौकशीत आणि मोबाईल डेटाच्या फॉरेन्सिक तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपी डॉक्टरने १५ पेक्षा जास्त हिंदू मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सुरुवातीला मैत्री करून, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढत असे. त्यानंतर याच फोटोंच्या आधारे तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता, तसेच त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप आहे.
गुन्हा उघडकीस आल्यानंतर आरोपी डॉक्टर फरार झाला होता, परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला आणि त्याच्या या कृत्यात मदत करणाऱ्या त्याच्या आई-वडिलांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून, या रॅकेटमध्ये इतर कोणी सामील आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
