नवी दिल्ली:
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीच्या दिशेने निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाची अक्षरशः हवा गुल झाली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या खंबीर आणि कडक प्रशासनापुढे या आंदोलनाचा फुगा असा काही फुटला की, केंद्राने आंदोलकांना दिल्लीच्या सीमेवरच रोखून धरले आणि त्यांना राजधानीत एक पाऊलही फिरकू दिले नाही.
पोलिसांच्या तगड्या फौजफाट्याने आणि लोखंडी बॅरिकेड्सने आंदोलकांना अक्षरशः कोंडीत पकडले. “आंदोलन करणार” असा आव आणणाऱ्या CJP च्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी आधीच रडारवर घेत जंतरमंतर तर दूरच, पण रस्त्यावर उतरूच दिले नाही. प्रमुख नेत्यांना आणि शेकडो समर्थकांना तातडीने ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये कोंबण्यात आले.
सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या फोल ठरलेल्या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. “आंदोलनाचा आव आणणारे नेते पोलिसांच्या एका इशाऱ्यानीशी कसे गारद झाले,” अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. मोदी सरकारच्या काळात अशा प्रकारच्या स्टंटबाजीला थारा मिळणार नाही, हे या संपूर्ण घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले असून CJP च्या या कथित आंदोलनाचा अत्यंत दयनीय अंत झाला आहे.
