नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे देण्यात आले आहेत.दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयक 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली आणि लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी वॉकआऊट केले होते. त्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर राज्यसभेच्या सभापतींनी विधेयक मंजूरीसाठी सादर केल्यावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यानंतर मतदान घेण्यात आले.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हेच या विधेयकाचे एकमेव आणि एकमेव उद्दिष्ट आहे. या विधेयकावरील चर्चेत प्रत्येक सदस्याने आपआपल्या समजुतीनुसार विधेयकावर चर्चा केली.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्ली हे सर्व राज्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे राज्य आहे. या ठिकाणी संसद भवन देखील आहे, घटनात्मक संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, दूतावास येथे आहेत आणि जगभरातील राष्ट्रप्रमुख येतात. त्यामुळे दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहे. येथील सरकारला राज्य यादीतील मुद्द्यांवर मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये विधानसभा आहे परंतु मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे ज्याला दिल्लीत निवडणूक लढवायची आहे त्यांनी दिल्लीचे चारित्र्य समजून घेतले पाहिजे असे म्हणत शाह यांनी केजरीवाल यांना टोला लगावला.यांनी म्हटले की, काँग्रेस विरोधाच्या सूत्रावर आम आदमी पक्षाचा जन्म झाला. त्यांनी (आप) काँग्रेसच्या विरोधात जवळपास तीन टन आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांचा पक्ष अस्तित्वात आला. आज ते या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मागत आहेत. ज्या क्षणी हे विधेयक मंजूर होईल, अरविंद केजरीवाल मागे फिरतील, तुम्हाला रस्ता दाखवतील आणि काहीही होणार नाही, असेही शाह यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले. विरोधकांनी कितीही पक्ष एकत्रित केले तरी काहीच फरक पडणार नाही. 2024 मध्ये पंतप्रधान मोदीच होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या काळात दिल्लीत विधानसभा अस्तित्वात आली. लालकृष्ण अडवाणी आणि मदनलाल खुराणा यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष केला. 1998 च्या जाहीरनाम्यात भाजपने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला होता. लाठ्या खाल्ल्या. तो दिवस आला जेव्हा वाजपेयी सरकारने विधेयक आणले, घटना दुरुस्ती विधेयक आणले, ज्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असे वक्तव्य हर्षवर्धन यांनी केले होते. हे विधेयक संविधानाचा आणि देशाचा अपमान करणारे आहे. हा अडवाणी, खुराणा, वाजपेयी यांचा अपमान आहे, असे चढ्ढा यांनी म्हटले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, तुम्ही अतिशय धोकादायक बिल आणले आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे भारतमातेशी अप्रामाणिक असल्याचे ठरतील. भारताशी बेईमानी करणार. देशाच्या संघराज्य रचनेवर थेट हल्ला होत आहे. लोकशाही ही हत्या आहे. निवडून आलेले सरकार आहे, विधानसभा आहे, लोकांनी नायब राज्यपालांना मतदान केले नाही, मुख्य सचिवांना मतदान केले नाही. नायब राज्यपाल मत मागायला जात नाही. केजरीवाल किंवा कोणताही नेता मते मागतो. तुम्ही सहा वेळा निवडणूक हरलात, दिल्लीत तुमचे मोजके आमदार आहेत. दिल्ली असो, महाराष्ट्र असो, तामिळनाडू असो, प्रत्येक जागा तुम्हाला काबीज करायची आहे.
Similar Posts
त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल
मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले,…
बीकेसीत होणार जागतिक दर्जाचेवस्तुसंग्रहालय – आशिष शेलार
मुंबई : देशाला अभिमान वाटावा असे जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय महाराष्ट्र सरकार बांद्रा येथील बीकेसीत उभारणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात राज्याचे माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री भाजप नेते आशिष शेलार यांनी ही घोषणा केली.या संग्रहालयासाठी जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले असून त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो, असे शेलार म्हणाले. या वेळी मुंबई…
मुंबईत भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी
मुंबई/विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालावर नजर मारली असता एक गोष्ट लक्षात येते की मुंबईमध्ये भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 23 आमदार तर महाविकास आघाडीला फक्त 12 आमदार निवडून आले. मुंबई हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड असतानाही या ठिकाणी भाजपाने बऱ्यापैकी जागा मिळाल्यात….
महाराष्ट्राला आपला सार्थ अभिमान!
…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राष्ट्रीय पदक विजेत्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पोलीस दलाला ७ शौर्य, ४ राष्ट्रपती पोलीस पदकांसह ५१ पदके केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उत्कृष्ट कामगिरीसाठीची पदके जाहीर मुंबई, दि. २५ : – भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या औचित्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दलातील कामगिरीसाठी पदक विजेत्यांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलाने ७ शौर्य पोलीस पदक, ४ विशिष्ठसेवेसाठी…
The New Mantra for Harnessing Human Capital – HR Summit 4.0- DES Mumbai Campus in Association with NIPM Mumbai Chapter Saturday, 9th October 2021 from 10.30 a.m.
Virtual Work Force and Cyber SecurityDES Mumbai Campus is 67-year-old. It has three Institutes under its ambit – Kirti M Doongursee College of Arts, Science and Commerce which is a under graduate college affiliated to University of Mumbai. Navinchandra Mehta Institute of Technology and Development which is a Post Graduate Institute offering MCA (Master of…
रामनवमीच्या यज्ञाला इंदोरमध्ये गालबोट
मंदिराच्या विहिरीवरील छत कोसळून १५ भाविकांचा मृत्यूभोपाळ – आज सर्वत्र रामनवमीचा उत्साह सुरु असतानाच मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये एक भयंकर दुर्घटना घडली. मंदिरात रामनवमी निमित्त यद्न्य सुरु असतानाच मंदिरातील विहिरवरचे छत कोसळून अनेक भाविक विहिरीत पडले या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या…
