नवी दिल्ली/ यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरात कोणताही बदल न करता जैसे थे स्थिती ठेवल्याने या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना फारसे काही मिळणार नाही.तर सिगारेट आणि दारू महाग केल्याने तळीराम अर्थमंत्र्यांवर नाराज झाले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी ८५ मिनिटे भाषण दिले पण सामान्यांसाठी कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नाहीत. तथापि, कर भरणे सुलभ करणे, रेल्वे प्रकल्प आणि आयुर्वेदिक एम्स यासारख्या नवीन उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला. अर्थमंत्र्यांच्या भाषणात कोणत्याही थेट निवडणुकीच्या घोषणांचा समावेश नव्हता. त्या तामिळनाडूची प्रसिद्ध कांजीवरम साडी घालून लोकसभेत आल्या, परंतु पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथे होणाऱ्या निवडणुकांवर थेट परिणाम करणाऱ्या कोणत्याही घोषणा केल्या नाहीत.
आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. सुधारित रिटर्न भरण्यासाठी तीन महिने अधिक वेळ देण्यात आला. याचा अर्थ सुधारित रिटर्न आता ३१ डिसेंबरऐवजी ३१ मार्चपर्यंत दाखल करता येतील.
तीन आयुर्वेदिक एम्स उघडण्याची घोषणा. वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पाच वैद्यकीय केंद्रे देखील स्थापन केली जातील.
१७ कर्करोगाच्या औषधांवरील आयात शुल्क काढून टाकण्यात आले आहे. सध्या, ५ टक्के शुल्क लागू करण्यात आले आहे. हिमोफिलिया, सिकल सेल आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारख्या सात दुर्मिळ आजारांसाठी औषधे देखील शुल्कमुक्त आहेत.
सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा. यामध्ये मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बेंगळुरू, हैदराबाद-चेन्नई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी यांचा समावेश आहे.
५००.००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या टियर-2 आणि टियर-3 शहरांच्या विकासासाठी १२.२लाख कोटी रुपये खर्च करण्याची घोषणा.
१५,०००माध्यमिक शाळा आणि५०० महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील.प्रत्येक जिल्ह्यात एक वसतिगृह असलेल्या अंदाजे ८०० जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी वसतिगृहे बांधली जातील.
दुसरीकडे, अर्थसंकल्पात फक्त आयात शुल्कात बदल केले जातात ज्यामुळे वस्तूंच्या किमतींमध्ये किंचित चढ-उतार होतात. या अर्थसंकल्पात काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले ते समजून घेऊया सरकारने १७ कर्करोगाशी संबंधित औषधांवरील मूलभूत सीमाशुल्क रद्द केले आहे. याव्यतिरिक्त, सात दुर्मिळ आजारांवर आणि विशेष अन्नपदार्थांवर उपचार करण्यासाठी आयात केलेल्या औषधांवर आता कर आकारला जाणार नाही. यामुळे उपचारांसाठी महागड्या परदेशी औषधांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना महत्त्वपूर्ण आर्थिक मदत मिळेल.देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रमुख भागांवरील सीमाशुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मायक्रोवेव्हच्या किमती कमी होऊ शकतात. भारताला ग्राहक इलेक्ट्रॉनिक्ससाठी जागतिक केंद्र बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.ऊर्जा व्यवहारांच्या दृष्टीने, सरकारने लिथियम-आयन बॅटरी उत्पादन यंत्रसामग्री (भांडवली वस्तू) वर कर सवलतीची व्याप्ती वाढवली आहे. आता, बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणालीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यांवरही शुल्कमुक्ती असेल. सौर काच उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सोडियम अँटीमोनेटवरील शुल्कही काढून टाकण्यात आले आहे, ज्यामुळे देशात सौर पॅनेल उत्पादन स्वस्त होईल मात्र हा बजेट निराशांक असल्याचे विरोधकांनी सांगितले. तर हा अर्थसंकल्प विकासाला चालना देणार असल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान दारू महागल्याने तळीरामणी नाराजी व्यक्त केलीय.
चौकट
काय महाग
सिगारेट,दारू,वैद्यकीय उपकरणे, पी वी सी ब्लॅक शीट,खनिज
काय स्वस्त
कॅन्सर,मधुमेहावरील औषधे
मोबाईल,एलसीडी, एल्व्हिडी, सी , एन,जी,सौर पॅनलमान्य माणसाला ठेंगा! दारू महागल्याने तळीराम नाराज
