मुंबई, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पीएम श्री स्कूल्स उपक्रम, परदेशात आयआयटींचा विस्तार, आणि १९ भाषांमध्ये प्रवेश परीक्षांचे आयोजन यासारख्या अनेक सुधारणा प्रधान यांनी घडवून आणल्या. व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला.
संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी वैयक्तिक हितापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, हेच एका समर्पित भाजप कार्यकर्त्याचे खरे वैशिष्ट्य आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याने राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली वारीवर असून, तेथे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
संसदीय गणिताचा भाग: मंत्री धर्मेंद्र यांचा राजीनामा
नवी दिल्ली संसदेत सीजीएस (नागरिक सुरक्षा कायदा) बिल सादर होण्यापूर्वीच्या राजकीय गणिताने भाजपला अडथळा आणणाऱ्या ‘कॉकरोच पार्टी’च्या आंदोलनाचा फटका बसू नये, म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र यांचा राजीनामा घेण्यात आल्या
चे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
संसदीय अंकगणिताच्या पार्श्वभूमीवर, भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. अशा वेळी आंदोलनाचा मुद्दा पेटवून ठेवल्यास विरोधकांना बिल पास करण्यात अडथळा आणता येईल. म्हणूनच, आंदोलनाची दखल घेऊन आणि वाद मिटवून, भाजपने राजकीय भेद अखंड करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री धर्मेंद्र यांच्या राजीनाम्यामुळे आंदोलनाचा मुद्दा थंडावला असून, संसदीय कामकाज सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
हा राजीनामा केवळ नैतिकतेचा नसून तो संसदीय गणिताचा भाग आहे. सीजीएस बिल सादर करण्यापूर्वी वातावरण शांत करण्यासाठी आणि विरोधकांना बिलविरोधी आंदोलनासाठी संधी न देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या २४ वर्षांत मोदी-शहा यांनी कधीही जनआंदोलनामुळे राजीनामा घेतला नव्हता. मात्र, संसदीय गणिताच्या दबावामुळे आणि आगामी बिलच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घ्यावा लागला.

