भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे मालकाने एक महिन्याचे भाडे थकल्याने मालकाने थेट मनसेच्या कार्यालयाला टाळे मारल्याने मनसेचे भानुशाली यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असताना याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी आणि उपाध्यक्ष प्रविण देवकर यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन भानुशाली आणि त्यांच्या पत्नीला पोलिसांसमोरच अपशब्द बोलून धमकावल्याने भयभीत झाल्या मुळे भानुशाली यांच्या पत्नीने शहर अध्यक्ष मनोज गुळवी, प्रविण देवकर यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे . या संदर्भात भिंवडी प्रतिनिधीने शहर अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असताना संपर्क होऊ शकला नाही….
Similar Posts
कलम 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा
श्रीनगर/कलम 370 रद्द करावे या भाजपच्या मागणीच्या विरोधात आज सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचे आमदार अत्यंत संतप्त झाले आणि त्यावरून विधानसभेत घोषणाबाजी सुरू झाली यावेळी नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराने 370 कलम रद्द करण्याचा प्रस्ताव मागे घ्या अशा आशयाचे फलक विधानसभेत आणले त्यामुळे चिडलेल्या भाजपा आमदारांनी तो फलक हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी भाजपा…
महाराष्ट्रात 66% मतदान- मुंबईतील मतदानाचा टक्का घसरला
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले ६६.११ टक्के इतके मतदान झाले हा टक्का मागील निवडणुकीपेक्षा अधिक आहे सर्वाधिक मतदान कोल्हापूर मध्ये झाले तर सर्वात कमी मतदान मुंबईमध्ये झाली मतदाना ग्रामीण भागात बऱ्यापैकी झाले याचा अर्थ ग्रामीण भागातील जनतेने मतदानात जास्त भाग घेतला होता कालच्या मतदानात चार हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणात बंद झाले असून…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीसह ४ मोठ्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द
दिल्ली/ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, काँग्रेस,सिपिआय,तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.. पवरांसाठी हा मोठा धक्का आहेज्या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे .त्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीत ६ टक्के मते मिळवली नव्हती त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने२०१९ च्या निवडणुकीत…
टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत
मुंबई/टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून भारतात परत आलेल्या रोहित शर्माच्या टीम इंडियाचे भारतात आणि खास करून मुंबई जंगी स्वागत करण्यात आले. वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर आज टीम मीडियाचे सकाळी सहा वाजता भारतात आगमन झाले .सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट…
