मुंबई: भायखळा संस्कृती आणि परंपरेचा मानबिंदू असलेल्या ‘भायखळ्याचा राजा’ (राम नगर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आपल्या अमृत सुवर्ण महोत्सवी (75 व्या) वर्षात भव्य पदार्पण केले आहे. या अमृत सुवर्ण महोत्सवी पर्वानिमित्त मंडळाच्या वतीने दक्षिण भारतातील प्रसिद्ध मदुराई येथील श्री मीनाक्षी मंदिराची अत्यंत देखणी आणि हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
या भव्य उत्सवाच्या आणि देखण्या देखाव्याच्या यशस्वी नियोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष शलाक घागरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर अशोक कानडे आणि सचिव योगेश जनार्दन घोडेकर यांनी उल्लेखनीय व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनामुळेच हा आकर्षक देखावा साकारणे शक्य झाले आहे.
गोपुरांची सूक्ष्म नक्षीकामयुक्त रचना आणि आकर्षक रोषणाईमुळे ही प्रतिकृती अत्यंत विलोभनीय ठरत असून नागरिकांमध्ये पाहण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही कलाकृती आणि भायखळ्याच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भायखळा, लालबाग व संपूर्ण मुंबई परिसरातून भाविकांची मोठी झुंबड उडाली आहे. ५० वर्षांची परंपरा जपणाऱ्या या मंडळाचा हा सुवर्ण महोत्सवी देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षण ठरत आहे.
भायखळा राजा गणपती मंडळाने अमृत महोत्सवी (७५ व्या) वर्षात वाटचाल करताना केवळ धार्मिक परंपराच जपली नाही, तर सामाजिक भानही जपले आहे. गेले अनेक वर्षे हे मंडळ अखंडपणे विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे.
मंडळाच्या वतीने जनतेच्या आरोग्यासाठी नियमितपणे रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाते. तसेच, शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना मदत म्हणून मोफत वह्या वाटप असा स्तुत्य उपक्रम सातत्याने चालवला जातो.
