[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार

मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत .

सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना , माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम यासारख्या उपक्रमांमध्ये संपूर्ण सहभाग महानगरपालिका प्रशासनाची विशेषतः विभाग कार्यालयांची यंत्रणा व्यस्त आहे. या कामांना आणखी वेग द्यावा. तसेच, जी – 20 परिषदेच्या मुंबईतील पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने नागरी सेवा-सुविधांची कामे व सुशोभीकरण अत्यंत वेगाने केले, त्याबद्दल नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जी – 20 मधील भारताचे श अमिताभ कांत यांनी पालिकेचे कौतुक केले आहे. हीच धडाडी व वेग कायम ठेऊन आता सर्व उपक्रमांमध्ये निश्चित केलेले लक्ष्य गाठावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार, संपूर्ण मुंबईसाठी 5 हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल दिसून येईल. यामध्ये हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर महानगरपालिकेचे डोळे व कान स्वरुपात प्रत्यक्ष कार्यरत राहतील, असेही डॉ. चहल यांनी विशेषत्वाने नमूद केले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेला मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना, प्रधानमंत्री स्व-निधी योजना, माझी मुंबई – स्वच्छ मुंबई मोहीम आदींचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांच्यासमवेत सर्व सह आयुक्त, परिमंडळांचे उप आयुक्त, संबंधित खात्यांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सर्व सहायक आयुक्त आणि संबंधित खाते प्रमुख यांची आ व्हर्चुअल आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

error: Content is protected !!