मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
गुरेढोरे माणसे आणि एस टी सुधा वाहून गेली महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
:मुंबई/ महाराष्ट्रात परतीच्या पावसाने हैदोस घातला असून मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने हैदोस घातलाय अनेक नद्यांना पुर आल्याने गुरेढोरे तर काही ठिकाणी माणसेही वाहून गेली उमरखेड तालुक्यातील दहागव नाक्यावर पुराच्या पाण्यात एस टी बस वाहून गेली त्यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला .मुंबईत सुधा सकाळ पासून पावसाची संततधार सुरू होतीसोमवारी रात्री पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
माता न तू वैरीनी!
जगाने आज विज्ञानाच्या जोरावर किती मोठी प्रगती केलीय हे समोर दिसत असतानाही भारतीय लोक मात्र अजूनही जुनाट आणि बुरसटलेल्या विकारांच्या चिखलात अडकलेले आहेत आणि त्यातून बाहेर येण्याची त्यांना अजिबात आवश्यकता वाटत नाही .म्हणूनच ते जुन्या रूढी परंपरांना चिकटून बसलेले आहेत.भारतात बेटी बचाव बेटी पढाव सरकारकडून राबवले जातेय आणि त्या अंतर्गत मुलगा आणि मुलगी यात फरक…
धनुष्यबाण कोणाचे निकाल 30 जानेवारीला
दिल्ली – धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे व ठाकरे गटांच्या वकिलांमध्ये युक्तिवाद झाला . दोघांनीही आपापली बाजू मांडली आता दोघांनाही त्यांचे लेखी म्हणणे मांडायला सांगण्यात आले असून या प्रकरणी पुढील सुनावणी ३० जानेवारीला असून त्याच दिवशी धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा निकाल लागणार आहे शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात…
डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
