[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिवाळीसाठी सरकारची नियमावली जारी

मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत

error: Content is protected !!