मुंबई/जे नियम हिंदूंच्या सणाला लावले जातात तेच नियम मुसलमानांच्या सणाला का लावले जात नाहीत असा सवाल करीत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सोसायटीमध्ये जबरदस्तीने कुर्बानी द्याल तर याद राखा असा इशारा मुसलमानांना दिला आहे . नितेश राणे यांच्या या इशाऱ्यामुळे मुस्लिम समाजात संतापाचे लाट उसळली असून बकरी इच्छा तोंडावरच एका नव्या धार्मिक वादाला तोंड फुटणार आहे
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात कुर्बानी बाबत काही कठोर नियम करण्यात आले आहे गोव्याच्या आयोगाने कसे परिपत्रक काढलेले आहे यामध्ये गोवंश प्रतिबंधक कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असा आदेश दिलेला आहे तसेच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सुद्धा बकरी दिवशी दिल्या जाणाऱ्या कुर्बानी बाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. या आठवडयाच्या शेवटी घेऊ घातलेल्या बकरी ईदच्या निमित्ताने त्यांनी सांगितले आमच्या सणांच्या वेळी फुकटात सल्ले देणारे बकरी ईदच्या वेळी कुठे गायब होतात. बकरी ईदच्या वेळी असे फुकटचे सल्ले का दिले जात नाहीत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राज्यातील मंत्री नितेश राणे यांनी यावेळी इशारा देत म्हटले की, एखाद्या सोसायटीत जबरदस्ती जर बकरा कापला गेला तर आमचे हिंदुत्ववादी सरकार त्याच्या विरोधात नक्कीच कारवाई करेल. हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही. तर हे आमचे हिंदू राष्ट्र आहे. इथे शरीया कायदा लागू होत नाही, असेही राणे म्हणाले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले होते की, कुर्बानी देणे हा आमचा अधिकार आहे. याबाबत राणे म्हणाले की, फटाके फोडणे हा आमचाधिकार नाही काय? होळी खेळणे हा सणांसाठी जबरदस्ती करू लागलो तर? आम्हाला होळी खेळण्यापासून का अडवले जाते, फटाके का फोडू दिले जात नाहीत, असा सवालही त्यांनी केला. हिंदूंचा सण असेल तेव्हा हे लोक कोणते ना कोणते मुद्दे समोर आणून तो साजरा होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतात, असेही राणे म्हणाले
नितेशराणे म्हणाले की, जेव्हा आमचे हिंदूंचे सण असतात, तेव्हा आम्हाला अनेक सल्ले दिले मिळतात. कोरडी होळी खेला, पर्यावरण पूरक होळी खेळा. दिवाळी येते तेव्हा आम्हाला सांगितले जाते की, फटाके फोडू नका. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. आता तेच लोक, जे आम्हाला फुकटात सल्ले देतात, ते बकरी ईदच्या वेळी पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा. का सांगत नाहीत? व्हच्र्युअली बकरा कापा, असं का सांगितलं जात नाही? बकरी ईदला हजारो बकरे कापले जातात, तर यावेळी आम्ही पर्यावरणपूरक ईद साजरी करू असा विचार मुसलमान समाज का करीत नाही??पुढे म्हणाले की, हिंदूंना सलना देणारे पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी आता कुठे गेले? बकरा कापण्यासाठी परवानगी दिली जातेच कशी? जर मुसलमान समाजाने हा बदल करण्यासाठी पुढाकार घेतला तर त्यामुळे खूप मोठा फरक पडेल, असेही ते म्हणाले.जेव्हा आम्हाला कोरडी होळी खेळा, असे सांगितले जाते तेव्हा आम्ही रंग खेळत नाही. 10 नंतर फटाके फोडू नका, असे सांगितले जाते, तेव्हा आम्ही ते फोडत नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेनुसार चालतो. जे नियम हिंदू पाळतात ते मुसलमान समाज का पाळत नाही, असा माझा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले.

