[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई


मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले होते पण तिथे ते न्यायालयीन लढाई हरले आणि न्यायालयाने पालिकेला कारवाईचा आदेश देताच पालिकेच्या एच वार्ड अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने 22 दुकाने जे सी बी चां साहाय्याने हटवली यावेळी दुकानातील समान कढण्यावरून पालिका अधिकाऱ्यांशी दुकानदारां चां काही काळ वाद झाला पण पोलीस बंदोबस्त असल्याने ही कारवाई पूर्ण झाली आणि रस्ता रुंदीकरणाच्या मार्ग मोकळा झाला

error: Content is protected !!