मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
भाजपच्या माजी मंत्र्यांकडून मिरजचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख !
मिरज – राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज वादग्रस्त विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सांगली शहरात हिंदू गर्जना सभेत ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्याचं संरक्षण आम्ही करणार असं म्हटलं आहे. त्याच सभेत माजी मंत्री आमदार सुरेश खाडे यांनी मिरजची थेट मिनी पाकिस्तान म्हणून तुलना केली आहे. यामुळे आता…
महायुतीच्या नेत्यांना अडकवण्यासाठी पवार – ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका ! माजी पोलीस आयुक्तांचा आरोप
मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली मातोश्री , सिल्व्हर ओक या ठिकाणी बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर , गिरीश महाजन यांना कोणत्या गुन्ह्यात कसे तक्ता येईल यावर चर्चा झाल्या असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहेमाजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह…
पोलिसांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहणार ?
मुंबई)मुंबई शहरामध्ये पोलीसांकरिता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने उचित शिफारशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या आणि सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या विचारात घेता, मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सुमारे ४० हजार निवासस्थाने तयार करण्यात येणार आहे. पोलीस उप-निरिक्षक व पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ५००० निवासस्थाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही निवासस्थाने…
महाराष्ट्र श्री साठी मुंबईतच काँटे की टक्कर
शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्या पुढाकाराने मुंबई श्रीच्याच मंचावर दिसणार पोलादी महाराष्ट्र शरीरसौष्ठवपटूंना मिळणार विम्याचे कवच! मुंबई, दि. ७ (क्री.प्र.)- शिवसेना पुरस्कृत ६१ व्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी शिवसेना सचिव युवानेते सिद्धेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील दमदार आणि जोरदार शेकडो शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले…
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन
मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे…
