[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुख्यमंत्री फडणवीस यांची आदित्यने घेतली भेट


मुंबई/ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंना ऑफर दिल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी बातमी आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे तब्बल साडेचार तास एकाच हॉटेलमध्ये होते. वांद्रेमधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून उपस्थित होते. त्यामध्ये अर्धा ते एक तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याच समजते.
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी सोफिटेल हॉटेलला गेले होते. सुरुवातीला आदित्य ठाकरे या हॉटेलमध्ये पोहोचले आणि नंतर एक तासाभराच्या अंतराने देवेंद्र फडणवीस पोहोचले. हे दोन्ही नेते साडेचार तासाहून अधिक वेळ या हॉटेलमध्ये होते.
सोफिटेल हॉटेलमधील कॅफेटेरिया एरियामध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी हा एरिया बंद करण्यात आला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याची माहिती मात्र मिळू शकली नाही.
आधीवेशनादरम्यान उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली यानंतर आता आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळी आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकाच हॉटेलमध्ये आल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे हे सोफिटेल हॉटेलमध्ये साडेपाच ते सहाच्या दरम्यान एका संगीत कार्यक्रमाला आले असल्याची माहिती आहे. तर त्याच सोफिटेल हॉटेलमध्ये एका खाजगी कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सातच्या दरम्यान आले असल्याची माहिती आहे.

error: Content is protected !!