ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

विधान भवनात मंत्री आमदार वगळता इतराना प्रवेशबंदी अध्यक्षांची घोषणा


मुंबई/गुरुवारी विधानभवनाच्या प्रांगणात भाजप आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जीराडेबाजी केली त्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे.या राडेबाजीबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर यापुढे मंत्री, आमदार आणि त्यांचे स्वीय सचिव वगळता कोणालाही विधानभवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.अध्यक्षांच्या या निर्णयामुळे मंत्री,आमदार आणि त्यांच्या अंधभक्तांना विधान भवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच त्यांच्या बैठकानाही परवानगी नसेल.
गुरुवारी विधानभवन परिसरात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्याला मारहाण केली होती .याचे विधानसभेत पडसाद उमटताच अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुरक्षा अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.शुक्रवारी दुपारी तो अहवाल अध्यक्षांना देण्यात आला त्यानंतर अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतले.
गुरुवारी विधिमंडळात झालेल्या राड्याचे पडसाद शुक्रवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजात उमटले.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास प्रस्ताव सादर करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, काल दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. विधानसभा समस्यांबाबत टीकाटिप्पणी झाली आहे. सभागृहात परिसरात ही घटना घडली. मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना मी अहवाल सादर करायला सांगितले होते. त्या अहवालानुसार दिसून येते की काल सायंकाळी मुख्य पोर्चमध्ये दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली. सुरक्षा पथकाने तात्काळ ती थांबवली.
त्याची चौकशी केली असता नितिन देशमुख याने जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. तर टकले यांनी गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले. संबंधित व इतर ७ जणांवर मरीन लाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राड्यानंतर आता संसदेप्रमाणे विधिमंडळातही नीतीमूल्य समिती स्थापन करणार असल्याची घोषणा नार्वेकर यांनी केली. आमदारांचे आचरण हे आदर्शवत असावे, असेही त्यांनी म्हटले.
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर आता विधानभवन परिसरात यापुढे इतर कोणालाही प्रवेश नसणार, याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली. यापुढे मंत्री, आमदार शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश नसणार. त्याशिवाय, मंत्र्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित प्रश्नांची चर्चा, त्यांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयातील दालनाचा वापर करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली.आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित सर्जेराव बबन टकले (वय ३७) आणि नितीन हिंदुराव देशमुख (वय ४१) यांच्यावर फौजदारी कारवाईची घोषणा नार्वेकर यांनी केली. त्यांच्याविरुद्ध चौकशी करुन विशेषाधिकार भंगाची कारवाई करण्यासाठी विधानसभा विशेषाधिकार समितीकडे दोघांचे प्रकरण वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जनतेला वाटतेय आमदार माजलेत/ मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई/ पावसाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेच्या प्रांगणात त जे काही घडलं ते अत्यंत भयंकर होतं त्या घटनेने सदनात बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा खराब झालीय.जनतेला वाटू लागलेय सगळे आमदार माजलेत.कालच्या घटनेने एक व्यक्तीची प्रतिष्ठा खराब झालेली नाही.तर आपल्या सर्वांची प्रतिष्ठा खराब झालीय.त्यामुळे यापुढे जबाबदारीने वागावे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कानपिचक्या दिल्या.

error: Content is protected !!