.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल
मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले,…
नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद
मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार…
सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक
सोलापूर : सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा…
राजं ठाकरेंची भूमिका अखेर उद्धव ठाकरेना पटली – परप्रांतियांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश – परप्रांतियांना सरकारचा पहिला धक्का !
मुंबई/ साकीनाका बलात्कार प्रकरणानतर सरकारची झोप उडाली असून आरोपी हा उत्तर भारतीय असल्याने परप्रांतीयांचा राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा उशिरा का होईना सरकारला पटला असून गंभीर गुन्ह्यातील बहुतेक आरोपी हे परप्रांतीय असल्याचे निष्पन्न होत असल्याने यापुढे मुंबईसारख्या महानगरात परप्रांतीयांच्या नोंदी ठेवा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत .परप्रांतियांना हा पहिला धक्का आहे मात्र…
खान बहादुर भाभा कुर्ला रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी -छोट्या संस्थांच्या पोटावर पाय देऊन बड्याना कंत्राटे
मुंबई/ पालिकेतील टेंडर घोटाळे काही नावे नाहीत पण एखाद्या कामाचे तोंडी टेंडर काढून ते मंजूर करण्याचा भयंकर प्रकार पालिकेच्या भाभा कुर्ला रुग्णालयात सुरू आहे.आणि आता त्याविरुद्ध छोट्या कंत्राटदार सेवा संस्थांनी आवाज उठवून पालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे . दिनांक ८ जून 2022 बहुउद्देशिय 33 कामगार पुरविण्याच्या कामाच्या कंत्राट बाबत असाच झोल झालेला आहे ….
