मुंबईतील ‘आम्ही सांगलीकर’ संघटनेतर्फे शिराळा तालुक्याच्या सुकन्या तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रथम महिला आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी श्रीमती अश्विनी भिडे यांचा भव्य सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा स्नेह मेळावा व सन्मान समारंभ सोमवार, ३० नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राम नाईक यांनी स्वीकारले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझा या वाहिनीचे व्हॉइस प्रेसिडेंट राजीव खांडेवाल यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या वेळी श्रीमती अश्विनी भिडे यांचा औपचारिक सत्कार करण्यात येईल.
श्रीमती अश्विनी भिडे या शिराळा तालुक्यातून आलेल्या प्रथम महिला आयएएस अधिकारी असल्याचे संघटनेचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी सांगितले. त्या १९९५ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असून मुंबई मेट्रोच्या विकासातील महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांना ‘मेट्रो वुमन’ या नावानेही ओळखले जाते. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथम महिला आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आहे.
सांगलीकरांना आवाहन
‘आम्ही सांगलीकर’ संघटना मुंबईतर्फे सांगली जिल्ह्यातील आणि विशेषतः शिराळा तालुक्यातील समस्त रहिवासी तसेच मुंबईत वस्ती करणाऱ्या सांगलीकरांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने श्रीमती भिडे यांच्या कार्यक्षम प्रशासनाची, शहराच्या विकासातील योगदानाची तसेच महिला सक्षमीकरणाची प्रेरणा असलेल्या यशाची दखल घेत सत्कार केला जाणार आहे.
