शिराळा तालुक्यातील शेतकरी पाण्याविना मरू दिला जाणार नाही. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीतून शिराळा व वाळवा तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पावसाने ओढ दिल्याने भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणीसह पिके करपली असून चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ फेरसर्वेक्षण करून शिराळा-वाळवा तालुक्यांचा दुष्काळी उपाययोजनांमध्ये समावेश करावा, तसेच पीकविमा, टँकर, चारा छावण्या आणि उपसाबंदी रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
अन्यथा काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर तीव्र जनआक्रोश आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. प्रा. सम्राट शिंदे व ॲड. रवि पाटील यांनी दिला.
