; शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे कथन केले गमक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेंव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे परखडपणे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारी वादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा शिवजन्मोत्सव आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम रामचंद्र चाळके, उपाध्यक्ष संजय विठोबा चव्हाण, सरचिटणीस राजेश गजानन दाभोळकर, सल्लागार सुबोध सखाराम सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.
Similar Posts
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजप कडून उत्पल पर्रीकर यांचा पत्ता कट
पणजी/ गोव्यात ज्यांच्या मुळे भाजपा रुजली वाढली आणि सतेपर्यंत पोचली ते गोव्याचे विकासपुरुष माझी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांना पणजी मतदार संघातून भाजपने तिकीट नाकारले आहे.काल भाजपने ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यात उत्पल पर्रीकर यांचे नाव नसल्याने गोव्यातील जनता संतप्त झाली आहेगोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे…
जनसुरक्षा विधेयकाने नागरिकांच्या हक्काला बाधा येणार नाही- मुख्यमंत्रीपत्रकार संघटनांच्या आक्षेपांची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कोणतीही बाधा येणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचात सहभागी राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींना दिला . या कायद्यातील तरतुदींवर विविध पत्रकार संघटनांनी घेतलेल्या आक्षेपाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली.महाराष्ट्रातील विविध १४ संघटनांनी एकत्रित येत पत्रकार अभिव्यक्ती…
दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात अनेक मध्यम व छोट्या बँकांनी उत्तम नफा कमावलेला आहे. तसेच काही बँकांचे एकत्रीकरणही यशस्वी झालेले आहे. खाजगीकरण करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे जाहीर करून याबाबतचे आवश्यक पाऊल केंद्राने नुकतेच टाकलेले…
ऑनलाइन गेमिंग वर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक ३५७ वेब साईट ब्लॉक केल्या ७०० विदेशी इ कंपन्या रडारवर
नवी दिल्ली/भारतात बेकायदेशीरपणे ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्यांवर केंद्राने अक्षरशा सर्जिकल स्ट्राइक केला असून तब्बल ३५७ वेबसाईट ब्लॉक केले आहेत त्याचबरोबर ७०० ऑनलाइन गेमिंग चालवणाऱ्या कंपन्या केंद्राच्या रडारवर आहेतविदेशी कंपन्यांच्या भारतातील ऑनलाईन गेमिंग वर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लागतो याप्रकरणी आतापर्यंत काही सेलिब्रिटी सहअनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि आता भारतात चालणाऱ्या ऑनलाइन गेमिंगच्या तब्बल ३५७ वेबसाईट…
छत्तीसगड मधील चकमकी २७ नक्षलवादी ठार
नारायणपूर/भारताच्या लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नक्षलवाद विरोधी मोहिमही तेज करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या अबूजमाड मधील जंगलात पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले .यात १ कोटींचे इनाम असलेला नक्षल कमांडर बसवराज राजूचा समावेश आहे.या चकमकीत एक जवान शहीद झाला.गडचिरोली…
