अहिल्या नगर/ जिल्ह्यातील जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनभंगाच्या तक्रारीनंतर गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते. परस्पर विरोधी तीन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर प्रार्थनास्थळी दहशत निर्माण करणाऱ्या जवळपास १३ आरोपींना जेरबंद करण्यात आलंय. मात्र, हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर आले असून शिकवणी घेण्याच्या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यास प्रवृत्त केलं जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या प्रकरणी अगोदर एक गुन्हा दाखल होता. आता आणखी दोन मुलींनी गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर चार आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत
आणखी दोन मुलींनी दिल्या आहेत.तक्रारी मध्ये आम्हाला आम्हाला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचं म्हणटलंय तर बोगस अकाउंट बनवून फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेलीय..शिकवणीला जात असलेल्या ठिकाणच्या शेख या शिक्षिकेने आमची त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देत सेल्फी काढण्यास सांगितले असल्याची फिर्याद दिलीय. तर तुम्ही आमच्या समाजाच्या रितीप्रमाणे वागत जा, टिकली लावत जाऊ नका, बुरखा घालत जा अस वारंवार ही शिक्षिका सांगत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. ओळख झालेल्या मुलांकडून सतत आम्हाला तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे मेसेज येत होते व नकार दिल्यानंतर मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादी अल्पवयीन मुलीने घडलेली सगळी हकीकत बोलून दाखवलीय

