शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि एक लोक कल्याणकारी राजा अशी जगात आपली ओळख निर्माण केली .रयतेच्या भाजीच्या देठाला सुधा हात लावू नका असा महाराजांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता.महाराजांनी या मराठी मातीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.आणि याच सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बळावर बलाढ्य अशा आदिलशहा, निजामशाह, आणि मोगल बादशहा यांच्याशी लढा दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे म्हणून इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगडावरील सोहळ्यात भाग घेताना रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी 59 कोटी देण्याचे जाहीर केले. ही शिवसृष्टी कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येईल पण तत्पूर्वी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. गडावरील अरिक्रमणे काढली पाहीजे. कारण हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौरशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ते भग्नावस्थेत आहेत.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या गडकिल्ल्यां कडे कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या नंतर आजही ते आहेत त्याच अवस्थेत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवली जाते पण महाराजांच्या या गडकिल्ल्यांचे भग्न अवस्थेतील हे स्वरूप पालटवून त्यांना नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. 300 च्या आसपास असलेल्या या छोट्या मोठ्या किल्ल्यांची जर व्यवस्थित डागडुजी केली तर हे किल्ले जागतिक पर्यटनाचे केंद्र बिंदू ठरतील आणि शिवशाहीचा इतिहास संपूर्ण जगभर पसरला जाईल. पण हे घडायला हवे त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी पुढाकार घ्यायला हवा आज राज्यात आणि केंद्रात सुधा भाजपचे सरकार आहे त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासाला निधी कमी पडेल असे होणार नाही. फक्त इथल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी लोकांची तशी मानसिकता असायला हवी.केवळ शिवजयंती आणि शिवराज्यभिषेक दिनाचे सोहळे साजरे करून चालणार नाही. काही पुढारी पुरातत्व विभागाच्या अडथल्या बद्दल बोलतात. महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करू नका असे पुरातत्व विभागाने कधीही आणि कुठेही म्हटलेले नाही बरे पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे केंद्राकडून मंजुरी मिळणार नाही का ? विनाकारण कोणतीही न पटणारी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारीतून हात झ्टकुन मोकळे व्हायचे हे काही बरोबर नाही.सरकारने पुढाकार घेतल्यास लोक स्वतःहून पुढे येतील पैशाची जराही कमतरता भासणार नाही केवळ सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी तरच हे महान कार्य पूर्ण होईल.शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक बांधन्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले नव्याने उभे राहणे गरजेचे आहे तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल.
Similar Posts
सर्व संपकरी कामगारांना 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर होण्याचे न्यायालयाचे आदेश
एस टी कामगारांचा संप अखेर मिटला?मुंबई/ विलीनीकरण मागणीसाठी गेल्या साडेचार महिन्यांपासून सुरू असलेला एस टी कामगारांचा संप अखेर मिटला कारण न्यायालयाने एस टी कामगारांना निवृत्ती वेतन आणि ग्रेज्यूटी देण्याचे सरकारला आदेश दिले आहेत तसेच एस टी कामगारांनी 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हावे असेही न्यायालयाने आदेश दिले आहेत आणि न्यायालयाचा हा आदेश एस टी कामगारांनी…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादी टार्गेट- पत्रा चाळ – पवारांशी नाळ?
मुंबई/ पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत याना फीट केल्यानंतर आता या प्रकरणात भाजपने पवारांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .त्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून पवारांच्या चौकशीची मागणी केली आहे.गोरेगावच्या पत्रचाल पुनर्विकास प्रकल्पात संजय राऊत हेच असल्याची माहिती इडी च्या अधिकाऱ्यांकडे आहे या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे राहणाऱ्या रहिवाश्यांना फसवण्यात आले ….
अपुर्णतेतील पुर्णता !
सर डॉन ब्रॅडमन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पॅरिसची परी मनू भाकर यांच्यात एक साम्य आहे. तिघांनीही आपल्या कौशल्याने खेळात इतिहास घडविला. नवनवे विक्रम रचले. आणि या तिघांच्या आयुष्याच्या एका वळणावर सगळे जग जिंकल्यांनंतरही एक अपुर्णता कायम हृदयात सलत राहीली. अर्थात त्या अपुर्णतेनेही या तिघांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिलाय. पॅरिसपासून अडीचशे किलोमीटर दूर शातरू…
बदलापूर का अडकतोय पुराच्या विळख्यात .
बदलापूर / प्रतिनिधी : बदलापुरात आठवड्याभरापूर्वी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून सावरत बदलापूर आता पूर्वपदावर आले आहे. मात्र पुरामुळे झालेल्या नुकसानीचा फटका सर्वसामान्य बदलापूरकरांना सहन करावा लागला आहे. नदी पात्राजवळच्या भागात, नाल्यांवर बांधकामे झाल्याने, नाले अरुंद झाल्यामुळे बदलापूरला पुराचा तडाखा बसत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे बदलापूरात नदीपात्राजवळच्या व शहरातील नाल्यांच्या जवळ झालेली बांधकामे नियमानुसार झाली…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
