पुणे/ मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आणि तसे झाले असते तर मुंबईत निवडणुकीच्या वेळी त्यांना मैदान मोकळे झाले असते म्हणूनच मी अयोध्या दौरा रद्द केला.असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे शरद पवार आणि एम आय एम यांच्यावरही कडाडून टीका केली
राजं ठाकरे यांनी सांगितले की सध्या पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे निवडणुका नसताना कशाला पावसात भिजायचं असे म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावला तर u उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका करताना सध्या तुमचे हिंदुत्व आणि आमचे हिंदुत्व यावर पकपक सुरू आहे त्यामुळे या लोकांनी वॉशिंग पावडर विकण्याचा धंदा सुरू केला आहे की काय असे वाटते औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत उद्वव म्हणाले की नामांतराच्या बघू मी आहेना! अरे पण तू कोण आहेस सरदार पटेल आहेस की महात्मा गांधी आहेस असा सवाल त्यांनी केला तर भाजप आमदार ब्रूज भूषण याना इथल्याच लोकांनी रसद पुरवली असाही आरोप केला आहे.दरम्यान राज ठाकरे यांच्या या भाषणावर सर्व राजकीय नेत्यांनी टीका केली आहे
