मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप करणारे माफीया, राजकीय सिडीकेट यांची आजही अब्जावधी रुपयांची बेनामी संपती मुंबईत आहे .यातले काही माफिया आज हयात नसले तरी त्यांचे वारसदार या बेनामी संप्तीचा उपभोग घेत आहेत . दक्षिण मुंबईत अशा हजारो मालमत्ता आहेत. ज्यात टॉवर, शॉपिंग मॉल, कंपन्या यासारखे व्यवसाय आहेत त्यावर कधी बुलडोझर फिरविणार .पालिकेत खैरनार नावाच्या एका उपायुक्तांनी दाऊदच्या बायकोच्या नावे असलेल्या जे जे हॉस्पिटल जवळच्या मेहजबीन या बेकायदेशीर इमारतीवर हातोडा चालवण्याचे धाडस दाखवले होते . त्याला मुंबईकरांचा मोठा पाठिंबा लाभला कौतुक झाले पण आज महापलिकेत चोर व चांडाळ बसलेले असल्यामुळेच माफियांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवला जात नाही . पापन्याना किती दिवस सांभाळणार एक ना एक दिवस हे माफिया राज्यकर्त्यांच्या पोटावर बसतील तेंव्हा त्यांना आपली चूक कळेल असे आज मुंबईकर म्हणत आहेत
Similar Posts
कोवीड विलगीकरण हॉटेल चालकांना यंदाही करमाफी
करोणा संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत विलगीकरणसाठी पालिकेने हॉटेल ताब्यात घेतली होती .या सर्व हॉटेल यांना दुसऱ्या वर्षीमालमत्ता कर माफ केला जाणार आहे . मुंबई महापालिका प्रशासन स्थायी समितीत 41 कोटी 87 लाख रुपयाची कर माफीचा प्रस्ताव ठेवला आहे .यामध्ये मागील वर्षी पालिकेने 180 हॉटेलांना वीस कोटी रुपये मालमत्ता कर माफ केला होता . यंदा …
जुहूच्या समुद्रात ५ मुले बुडाली एकाला वाचवण्यात यश
मुंबई: जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. वाकोला परिसरामधून पोहायला आलेल्या आठ लहान मुलांपैकी ५ मुलं बुडाल्याची माहिती समोर येत आहे.यापैकी एकाला वाचवण्यात यश आले आहे तर चौघांचा शोध सुरु आहे .या चोघांमध्ये जय रोशन ताजबरिया १५,शुभम योगेश योगनिया १५,मनीष योगेश योगनिया १२,आणि धर्मेश वल्जी फौजिया १६…
देशाचा गौरव वाढविणारे क्रिकेटपटू निर्माण व्हावेत
मुंबई क्रिकेट असोसिएशनला संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि 29: राज्यात आणि देशात उत्तम क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या विकासासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री बोलत होते. वानखेडे…
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
अखेर फरारी अमृतपाल पोलिसांना शरण
अमृतसर -एक मोठी बातमी समोर येत असून, वारीस पंजाब दीचा प्रमुख फरार असलेला अमृतपाल सिंहला अखेर 36 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतः आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याला मोगा येथील गुरुद्वारातून ताब्यात घेत अटक केली आहे. अमृतपालला तब्बल ३६ दिवसांनी पोलिसांनी पकडले आहे. अजनाळा घटनेनंतर तो फरार झाला होता. तर त्याची पत्नी किरणदीप कौर…
गंजत” चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !
आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यामुळे “गंजत” चाललेली आहे. इंग्रजीमध्ये ‘जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड’ म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे आहे अशी म्हण आहे. भारताच्या बाबतीत ती तंतोतंत लागू होते. ‘इंग्रजी’ मानसिकतेतून भारतीय न्यायव्यवस्था बाहेर पडण्याची चिन्हे नाहीत. देशाच्या…
