मुंबई/ गेल्या चार वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच झालेल्या नसल्याने पालिकेवर प्रशासक आहे.मात्र प्रशासनाच्या कार्यकाळात बदल्या आणि भारतीयांमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये असंतोष होता.त्यातच निवृत्त सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना थेट पालिका आयुक्तांचे ओ एस डी केल्याने वादाचा भडका उडाला हे पद उपयुक्त आणि सह आयुक्त संवर्गातून भरावे या मागणीसाठी पालिकेत लेटर बॉम्ब टाकले जात आहे सुरुवातील उपायुक्तांनी आणि आता सह आयुक्तांनी बंडाचे निशाण उगारले आहे त्यामुळे पालिका प्रशासनातील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे
सहआयुक्त आणि उपायुक्तांनी याआधी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयुक्तांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी उपायुक्त (आयुक्त कार्यालय) हे पद तत्काळ सहआयुक्त, उपायुक्त या संववर्गातून भरण्याची मागणी केली आहे. या मागणीस आता मुंबई महापालिकेतील सर्व सहायक आयुक्तांनी पाठिंबा दिला आहे.
या पत्रात म्हटले आहे की, नियमती अधिकाऱ्याचे पद रिक्त ठेवून तिथे समांतर अधिकार्याची नेमणूक अन्यायकारक आहे. यामुळे या संवर्गातील अधिकाऱ्यांचे पदोन्नती, सेवेचा कालावधी, अनुभव, निवडश्रेणी, वेतनश्रेणी यामध्ये बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळे आयुक्त कार्यालयातील उपायुक्त हे पद तत्काळ सहआयुक्त, उपायुक्त संवर्गातून भरावे ही मागणी होती
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांच्या कार्यालयाचे सह आयुक्त चंद्रशेखर चोरे ३१डिसेंबर २०२४ रोजी विहीत वयोमानानुसार निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अर्थात 1 जानेवारी २०२५ पासून त्यांना मुंबई महापालिकेत आयुक्त कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्त करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या या नियुक्ती पत्रात पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती राहिल असा उल्लेख केल्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
महानगरपालिकेत आजपर्यंत उपायुक्तांची आयुक्तांच्या ओएसडी पदी नियुक्ती झालेली नाही. ही नियुक्ती प्रथा, परंपरा आणि संकेतांना डावलून झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रशेखर चोरे यांना त्याच पदावर बसवण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे सर्व उपायुक्तांना आपला अधिकार डावलला जात असल्याची भावना झालीअसल्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा उगारत पालिका आयुक्तांना पत्रातून नाराजी व्यक्त केली. उपायुक्तांच्या पत्रानंतर आता महापालिकेतील सर्व सहायक आयुक्त यांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे.
मुंबई महापालिकेतील १७ उपायुक्तांनी आधी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले होते. तेव्हा सहायक आयुक्तांनी त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता ११ नोव्हेंबर रोजी २० सहायक आयुक्तांनीही पत्र लिहून या हक्कांच्या लढाईला सहाय्यक आयुक्तांचा सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.
महापालिका आयुक्त गगराणी यांनी चंद्रशेखर चोरे यांच्याबद्दल काहीही निर्णय घेतला नाही, तर सहाय्यक आयुक्त देखील या लढाईत उतरणार असे आधीच निश्चित झाले होतेत्यानुसार आता सहायक आयुक्तांनी लेटर बॉम्ब टाकला आहे. तसेच येत्या काळात या विषयाला राजकीय रंग येण्याचीही शक्यता आहे. चंद्रशेखर चोरे यांनी पालिका आयुक्त कार्यालयात जम बसवला असून त्यांचा मनमानी कारभार सुरु असल्याची अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

