मुंबई:काँग्रेसच्या सहकार विभागाच्या वतीने आगामी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य “सहकार परिषदेचे” औपचारिक निमंत्रण माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांना नुकतेच भेट देऊन दे-ण्यात आले. या प्रसंगी मुंबई काँग्रेसच्या सहकार विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सहकार विभागाचे अध्यक्ष. यशवंत (भाई) सावंत आणि कार्याध्यक्ष . धनंजय कुवेसकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने थोरातांची भेट घेतली. प्रशासकीय सरचिटणीस श्रीनिवास देवरुखकर, केनेथ मिस्केटा, दिलीप खांदेशी, रविंद्र निकाळे, मनिषा चौधरी, शंकर मोहिते आणि भरत सिरोया आदी मान्यवर या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
