पाटणा/बिहारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील विधानसभे २४३जागांपैकी भाजपा आघाडीने २०० हून अधिक जागा जिंकल्या. आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या निकालांची आठवण करुन दिली आहे. या निवडणूकीत भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जेडीयू यांनी केवळ कमालच केली नव्हती तर विरोसाल २०१० मध्ये बिहारच्या राजकारण लालू यादव सक्रीय होते. तेजस्वी यादव त्याकाळी राजकारणाची कदाचित बाराखडी शिकत होते. सध्या लालू यादव वय आणि विविध आरोप आणि शिक्षेमुळे राजकारणापासून दूर आहेत. त्याचे राजकारण आता त्यांच्या घरापर्यंत मर्यादित झाले आहे. लालू पक्षाचे प्रमुख असले तर सध्या तिकीट वाटपासह राजकीय जबाबदारी तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. एक दोन प्रचारसभा वगळता लालू यादव प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकांचे संपूर्ण नेतृत्व तेजस्वी यादव यांच्याकडे होते. परंतू निकाल साल २०१० ची आठवण करुण देणारे आहे. मोठा झटका दिला आहे.बिहारच्या साल २०१० च्या विधानसभा निवडणूकांवर लक्ष घातले तर तेव्हा नितीश कुमार यांची जेडीयू एनडीएचा भाग होती. तेव्हा जागा वाटपाच्या वाटणीनुसार जेडीयू १४१ वर निवडणूक लढवली होती. तर भाजपाने १०२ जागी मैदानात उतरली होती. या निवडणूकीत बिहार भाजपाच्या वतीने सुशील कुमार मोदी ओळखीचा चेहरा होते. आता मात्र, त्यांचे निधन झाले आहे. या निकालामुळे काँग्रेसची देशपातळीवर फजेती झाली आहे महाआघाडीला ५० जगही मिळवता आल्या नाहीत .आघाडीच्या अनेक दिग्गजांचा पराभव झाला .लालु पुत्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला.आता नितीश कुमार पाचव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.या निवडणुकीत मोठा गाजावाजा करून उतरलेल्या प्रश्न किशोरला ५ जगही मिळवता आल्या नाहीत.

