सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
बंगाल, बिहार, यूपीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रा नंतर समाजकंटकाकडून दंगल घडवण्याचे प्रयत्न
कोलकाता/राम नवमीच्या शोभायात्रेत भाग घेऊन परतणाऱ्या रामभक्तांवर पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यासह अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आल्यामुळे रामनवमी उत्साहाला गालबोट लागले तसेच बिहारच्या अनेक भागांमध्ये शोभायात्रांचे रोड बदलण्यात आल्यामुळे राम भक्तांमध्ये संतापाची लाट होती तर कानपूर मध्ये शोभायात्रेत पोलीस व राम भक्तांमध्ये हाणामारी झाली त्या सर्व घटना पाहता रामनवमीच्या निमित्ताने काही समाजकंटकांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता परंतु…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंवर गुन्हा दाखल
मुंबई/ औरंगाबादच्या सभेत केलेल्या स्फोटक भाषणं प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दखल होणार आहेत .औरंगाबाद मधील सभेत राज ठाकरे यांनी सभेसाठी घातलेल्या 16 पैकी 12 अटींचे राजने उल्लंघन केले त्यामुळे याबाबतचा अहवाल गृहमंत्र्यांनी मागवला होता तो अहवाल पोलीस…
आयोध्या दलित महिलेची क्रूर हत्या हातपाय बांधलेल्या अवस्थेत युवस्त्र मृतदेह आढळला
अयोध्या/अयोध्ये नदीच्या का गावात दलित महिन्याचा हातपाय बांधलेल्या अवस्थेतील विवस्त्र मृतदेह सापडलं विशेष म्हणजे या मृतदेहाचे डोळे काढण्यात आले होते तसेच तिला ठार मारण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते या घटनेमुळे आयोजित एकच खळबळ मानवी आहे अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांनी ही सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर सांगताना त्याला अश्रू अनावर झाले होते या घटनेचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला
कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट फसल्याचे उघडकीस आले असून कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासाह बब्बर खालसा चे चार दहशतवादी पोलिसांच्या हाती लागलेत .फीरोजपुर येथून एक इनोव्हा कार दिल्लीच्या दिशेने निघाली आहे आणि त्यात काही संशयास्पद लोक आहेत अशी माहिती हरयाणा पोलिसांना…
महाकुंभ बाबत- ममताच्या विधानामुळे हिंदूंमध्ये संताप
कोलकाता – सुर्याग्रज मधील कुंभ मेळ्यात आतापर्यंत ५२ कोटी भाविकांनी स्नान केले . असे असतानाही या कुंभमेळ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. कुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर टीका करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभाला मृत्यूकुंभ म्हटले आहे तसेच या कुंभमेळ्यात सरकारने चांगले नियोजन केले नाही असा आरोप करून योगी सरकारवर टीका केली आहे त्यामुळे…
