मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहे
सरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे लावून महा आरती करणारच असा निर्धार मनसेने व्यक्त केल्यानंतर काल महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि नाशिक पोलिसांनी जो निर्णय घेतला आहे त्याच निर्णयाची सर्वत्र अमलबजावणी करायची ठरले आहे त्या नुसार भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे त्याच बरोबर धार्मिक स्थळांच्या 100 मीटर परिसरात भोंगे लावता येणार नाही या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे . दरम्यान काल मनसेनेही बैठक घेऊन 3 मे रोजी राज्यभर महाआरतीचे आयोजन केले जाणार आहे. आणि त्याच दिवशी मुस्लिमांची ईद असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे दरम्यान राज ठाकरे 10 हजार कार्यकर्त्यांना घेऊन 5 तारखेला अयोध्येला जाणार आहेत त्यासाठी पाच ट्रेन बुक करण्यात आल्यात .
