मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. कोविड काळात त्यांनी शहर विभागातील नालेसफाईचे काम वेळेत पूर्ण करून साथीचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घेतली. आपल्या पालिका सेवेत वेगवेगळ्या विभागात काम करताना त्यांनी त्या विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला असे हे कर्तव्य तत्पर दाभाडे आता निवृत्त होणार आहेत.
Similar Posts
मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला रंग फासला मुंबईत संतापाची लाट!आरोपीला काही तासातच अटक
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मा साहेब मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क मधील पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.या घटनेनंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंसह शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी पुतळ्याची पाहणी करून संताप व्यक्त केला.तसेच २४ तासात आरोपींना पकडण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री अशोक शिंदे यांचे दुःखद निधन
; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : कांदिवली येथील ठाकूर संकुलात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्री अशोक शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या त्या पत्नी होत…
मोघल आणि ब्रिटिशा नंतर देशाला काँग्रेसने लुटले/ योगी आदित्यनाथ
लखनौ/उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. ‘मुघल आणि ब्रिटिशांनी देश लुटल्यानंतर जे काही उरले होते, ते या दोन्ही पक्षांनी खिशात घातले,’ अशी घणाघाती टीका योगींनी केली. ते एटा येथे एका नवीन सिमेंट प्लांटच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. १९४७ ते…
पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या; बोरीवली पूर्व येथे समारंभपूर्वक वितरण
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : शाळा सुरू झाल्या, पावसाळा आला की विविध संस्था, राजकीय पक्ष वह्या पुस्तके आणि छत्र्यांचे वाटपाचे कार्यक्रम जोमाने हाती घेतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस योगायोगाने पावसाळ्यात येतात. मग काय. दे धम्माल ! १३ जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून शिवसेनेचा…
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
