मुंबई/ महापालिकेतील सतेच्या माध्यमातून मोठ मोठे झोल करणाऱ्या शिवसेना नेत्यांवर आता आयकर , ई डी सारख्या तपास यंत्रणांनी कारवाईचा फास आवळायला सुरुवात केली असून काल आयकर विभागाने स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात वांद्रे येथील 25 कोटींच्या फ्लॅटचा सुधा समावेश आहे
काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला होता या छाप्यात प्रंचड मोठ्या बेनामी संपत्तीचा खुलासा झाला होता जवळपास तीन चार दिवस आयकर अधिकारी झाडं झडती घेत होते या चौकशीत त्यांना यशवंत जाधव यांच्या घरात फार मोठे घबाड सापडले होते त्यानंतर मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे यशवंत जाधव यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना कुठून कुठून कसा आणि किती पैसा मिळवला याची सर्व माहिती होती आणि याच माहितीच्या आधारे काल आयकर विभागाने यशवंत जाधव आणि त्याच्या कुटुंबियांच्या 40 मालमत्ता जप्त केल्या आता त्यांची जी एक डायरी सापडली आहे . तिचे धागेदोरे थेट वरिष्ठ पर्यंत पोहचले असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नजीकच्या काळात आणखी मोठा धमाका होण्याची शक्यता आहे .
