पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
टाकवे ( सांगली ) येथील भैरवनाथ सोसायटी मध्ये शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय-
विद्यमान अध्यक्ष संजय ठोंबरे यांच्या कामाला पंसती-सांगली -जिल्ह्यातील टाकवे येथील सोसायटी च्या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 जागा जिंकून अक्षरशः एकहाती विजय मिळवित आपली सत्ता राखली आहे तर विरोधी पक्षाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे . विजयानंतर या पॅनलच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. सोसायटीच्या निवडणुकीत 359 पैकी 205 सभासदांनी…
प्रभाग रचना तयार ठेवा – मुंबईसह 14 महापालिकांना निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई- मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात आज महत्त्वाचे आदेश काढले आहेत. नवी मुंबई, वसई-विरार, उल्हासनगर,कोल्हापूर, अकोला अमरावती, नागपूर सोलापूर, नाशिक,पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली,बृहन्मुंबई, ठाणे या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडनुक आयोगाने राज्यातील सर्व महापालिकांच्या आयुक्तांना काढले आहेत.त्यानुसार अंतिम प्रभाग रचनेचे कामकाज येत्या दि:-११-मे पर्यंत पूर्ण करावे. दि:-१२-मे…
अनिल देशमुख यांना अटक होणार १२तास चौकशी
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अडकलेले माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची काल १२तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असून त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते परमवीर सिंग यांनी देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीचा आरोप केले होते त्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआय आणि ई डी ने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला . तसेच त्यांच्या स्विय सहाय्यक…
जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी
मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी…
कॅप्टन ने संघ बदलला पंजाबचे माजी मुख्यमंत्री भाजपा मध्ये जाणार?
चंदिगढ/ पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमदर सिंग यानी काल दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यामुळे ते आता काँग्रेस मधून भाजपात जाणार हे जवळपास नक्की झाले आहेकॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरुद्ध माझी क्रिकेटपटू व पंजाब काँग्रेसचे माझी अध्यक्ष बलविंदर सिंग सिद्धू याने मोठे षडयंत्र रचून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हतबल आणि त्यांच्या जागी सुरजित सिंग चंनी…
पोलिसांची सरकारकडून क्रूर चेष्टा फक्त ७५० रुपये दिवाळी भेट
मुंबई/ क रोणा काळा त स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी बारा बरा तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांची महाराष्ट्र सरकारने ७५० रुपये दिवाळी भेट देऊन क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे खासगी कंपन्या आणि सरकारच्या विविध आस्थापना मधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनाही दिवाळी निर्मित २० हजार…
