मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
महाराष्ट्रात अतिवृष्टीचे १२ बळी
मुंबई/ महाराष्ट्राच्या मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रकोप सुरू असून या पावसाने आतापर्यंत १२ जनाचे बळी घेतले आहेत.तर ७० लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पाहणीनंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे….
बाबा सिद्दिकी मर्डर केसला नाट्यमय वळण – एस आय टी तपासासाठी सिद्दिकीची पत्नी न्यायालयात
मुंबई/ माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी शेहझीन सिद्दीकी यांनी केली आहे. याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
धक्कादायक! आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातच नालेसफाई मध्ये दिरंगाई – कंत्राटदाराला साडेतीन लाखांचां दंड
मुंबई/नालेसफाईत कंत्राटदारांची हातसफाई हे काही नवीन नाही यावेळी पालिकेने 31 मे पर्यंत 87.12 टक्के इतके नाले सफाईचे उद्दिष्ट ठेवलेले होते त्यासाठी मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 7 तर इतर छोट्या मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 24 वार्ड मध्ये 24 कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईच्या हिताची सर्वाधिक काळजी वाहणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी…
भिवंडीत लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या ग्रामसेविकेस निलंबित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले टाळे…
भिवंडी दि 25(आकाश गायकवाड )ग्रामपंचायतीं करीता राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत विकास कामांसाठी लाखो रुपये दिले जात असताना केंद्र शासनाच्या 14 वित्त आयोगा मार्फत भिवंडी तालुक्यातील दुगाड ग्रामपंचायतीस दिलेल्या 11 लाख रुपयांच्या निधींवर चक्क ग्रामसेविकेने डल्ला मारला असून तिला निलंबित करण्याच्या मागणी साठी ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले आहे . भिवंडी…
शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न- बँकेचे मोबाईल ऍप कार्यरत
मुंबई/ सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या शालीनी सहकारी बँकेची 41 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली . या सभेला बँकेचे सर्व भागधारक उपस्थित होते यावेळी बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई यांनी बँकेचे मोबाईल ऍप काढून बँकेचे बहुसंख्य सभासद खातेदार याना एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली . या सेवेचा खातेदारांना चांगला लाभ घेता येईल असा विश्वास…
