त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ
मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं करणार आहोत असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केले होते त्यावर बोलताना एका शहराचं नाव काय बदलतात अख्ख्या देशाचाच नाव बदलून टाका अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते केली होती त्यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर संतापाची लाट मिसळली असून अबू आझमी वर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे
मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसेकडून जाहीर इशारा देण्यात आला आहे. मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट करुन जाहीर इशारा दिला आहे. “कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
या देशातील महागाई बेरोजगारी कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षा यासारख्या गंभीर प्रश्नांवरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा कडून शहरांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु अशा प्रकारे शहरांची नावे बदलण्यापेक्षा संपूर्ण देशाचा नाव बदलून टाका अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते यांनी केली आहे त्यांच्या या मागणीमुळे देशात मोठी खळबळ माजली आहे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसह विरोधी पक्षातील काही नेत्यांनीही अबू आजमी च्या या मागणीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अशा प्रकारची मागणी करताना विचार करायला हवा होता. त्यांची ही मागणी अत्यंत बेजबाबदारपणाची आहे त्यामुळे या प्रकरणी सरकारने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी असे महायुतीच्या नेत्यांनी म्हटले आहे
