पनवेल दि. १८ जुलै – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन चा पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक – ९ जुलै रोजी पनवेल येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली व District ESO शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी आपल्या गतवर्षीच्या कार्यकाळातील कामाचा आढावा सादर केला व नूतन अध्यक्षा कल्पना नागावकर यांना अध्यक्ष पदाची सूत्रे सोपवून त्यांना शुभेच्छा दिल्या. डीस्ट्रीकट चेअरमन मुक्ती पानसे यांनी व्हिडीओ द्वारे नवीन टीम ला शुभेच्छा दिल्या. यावेळी दहा नवीन सभासदांना क्लब चे सदस्यत्व देण्यात आले. नवीन टीम मधील व्हाईस प्रेसिडेंट नीता बोराडे, सचिव सई पालवणकर, कोषाध्यक्ष शुभदा भगत, आय. एस. ओ. पल्लवी मुनोत, एडिटर शीतल गायकवाड, Club Correspondent ज्योती गुंदेचा कार्यक्रमास हजर होत्या. या वर्षीच्या वर्क वंडर्स या थीम ला अनुसरून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय सेवेच्या कार्यक्रमावर भर दिला जाणार आहे. त्यात महिला व पौगंडावस्थेतील मुलींच्या हिमोग्लोबिन वाढीसाठी, कॅन्सर या जीवघेण्या आजारावरील प्रतिबंधासाठी जनजागृती तसेच महिला स्वावलंबी होण्यासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा मानस असल्याचे नूतन अध्यक्षा कल्पना नागावकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. पदग्रहण सोहळ्याच्या वेळी महिलांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात आली.
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी
मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात…
आता सहकार क्षेत्रातील घोटाळे बाजांची खैर नाही-
मुंबई/महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल एक बैठक बोलावली होती या बैठकीच्या माध्यमातून अमित शहा यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती घ्यायला सर्वात केल्याने आता सहकार क्षेत्रातील लुटारूंनी खैर नाही असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई…
बेरोजगार संस्थांच्या तोंडचा घास पळवण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा डाव-आतिरिक्त आयुक्त संजिवकुमार काय निर्णय घेतात ?
.मुंबई/ पालिका रुग्णालयाना कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम छोट्या छोट्या बेरोजगार संस्थाकडे असते. पण आता केईम सारख्या मोठ्या पालिका रुग्णालयात 211 कर्मचारी पुरवण्याचे काम मोठ्या कंत्राटदारांना दोन वर्षासाठी दिले जाणार आहे .या कंत्राटी कामगारांना रोज 699 रुपये नियमाने मिळणे बंधनकारक आहे . बेरोजगार संस्थाकडे जेंव्हा हे कंत्राट आहे . तेंव्हा त्यांना त्यांचा ठरलेला 699 रुपयांचा…
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई – जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी १९ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संप आज सरकार बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आलाराज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख…
कोरोनाणे मोडले पालिकेचे आर्थिक कंबरडे
मुंबई/ कोरोनाणें जितका त्रास सर्वसामान्य जनतेला आणि आरोग्य यंत्रणेला दिला तितकाच पालिकेला सुधा दिला कोरोनाच्य दीड वर्षांच्या काळात पालिकेला तब्बल अडीच हजार कोटींचा फटका बसलाय. कोविड सेंटरचे भाडे तसेच आरोग्य सुविधा यावर होणारा खर्च अफाट आहे दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटरचे उदाहरण द्यायचे झाल्यास रोज एका बेड मागे १,१०० रुपये इतके भाडे द्यावे लागते.मुलुंड येथे…
पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूट
पुराच्या संकटात अडकलेल्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल कडून लूटकोल्हापूर/ पुराच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल वाल्यांनी चांगलीच लूट केली गोव्यातून सुटणार्या गाड्यांमध्ये प्रवाशांकडून प्रती सिट 2000 ते 1200 रुपये घेतले जात होते मात्र त्यांना कोल्हापूरच्या शिरोळ टोल नाक्यावर नेवून थांबवले जात होते .कोल्हापूरच्या हायवेवर 8 फुटांपर्यंत पणी असल्याने पोलिसांनी पुणे बंगळुरू मार्गावरील वाहतूक बंद…
