चंदीगड/पोलिसांनी मोठी कामगिरी पार पाडली. लुधियानामध्ये आयएसआय-संचालित मॉड्यूलचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी परदेशी हँडलर्सच्या १० प्रमुख एजंटांना अटक केली आहे. आरोपी ग्रेनेड उचलण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी मलेशियातील तीन एजंटांमार्फत पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.५ लाख सॅलरी अन् इतरही फायदे मिळत होते.दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी लोकवस्ती असलेल्या भागात ग्रेनेड हल्ला करण्याचे काम या दहशतवाद्यांना देण्यात आले होते. राज्यात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पंजाब दहशतवादाचा नाश करण्यासाठी आणि सीमापार दहशतवादी नेटवर्क नष्ट करण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही पोलिसांनी सांगितले.आरोपी मलेशियातील तीन एजंटांद्वारे पाकिस्तानातील हँडलर्सशी संपर्कात होते आणि त्यांनी हँड ग्रेनेड उचलून ते पोहोचवण्याचे काम केले होते. त्यांचे ध्येय लोकवस्तीच्या भागात हल्ला करणे होते. अटक केलेले १० कार्यकर्ते त्यांच्या पाकिस्तानातील हँडलर्सशी थेट संपर्कात होते. हा संपर्क थेट नव्हता, तर मलेशियातील इतर तीन कार्यकर्त्यांद्वारे होता. ग्रेनेड उचलून ते हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचवण्याचे संपूर्ण समन्वय याच माध्यमांद्वारे पार पाडण्यात आला.

