ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकात टिटवाळा लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. ४० मिनिटांहून अधिक हि लोकल मुंब्रा स्थानकात अडकून पडल्याने धीम्या डाऊन मार्गावर गाड्यांची रांग लागली होती.
सीएसएमटी वरून टिटवाल्याकडे निघालेली एक लोकल रात्री साडेनऊच्या सुमारास मुंब्रा स्थानकात येताच मोटरमनच्या पहिल्या डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि घडी प्लॅटफार्मला घासून गेली . यावेळी मोठा आवाज झाल्याने प्लॅटफार्म आणि लोकलमधील प्रवाशांमध्ये घाबरहाट माजली सुदैवाने लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात आलेली असल्याने तिचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी हानी झाली नाही पण या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक तासभर कोलमडली होती
