पोलिसांच्या अटी जरागेना अमान्य! संघर्ष अटळ
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निघालेले मराठा आंदोलक आज मुंबईत धडकणार आहेत. पण सरकारने त्यांना २० सशर्त अटीसह केवळ एका दिवसाची परवानगी दिली आहे.मात्र जरांगेना हे मान्य नाही. त्यामुळे पोलिस व आंदोलक यांच्यात संघर्ष अटळ आहे.दरम्यान जरंगेच्या विरोधात आता ओबीसीही आक्रमक झाले असून, आज ओबीसी महासंघाच्या बैठकीत जरांगे यांच्या दबावाला घाबरून, जर सरकारने काही चुकीचे पाऊल उचलल्यास आम्हीही रस्त्यावर उतरू .असा इशारा ओबीसीं महासंघाने दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते. यंदा गणेशोत्सव असून मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. त्यात विघ्न येऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवागनी दिलेली नाही. तसेच मुंबई पोलिसांनी आज (२७ ऑगस्ट) आंदोलनासाठी काही अटी ठेवल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला केवळ एक दिवसांची परवानगी दिलेली आहे परंतु जरांगे मात्र बेमुदत उपोषण करण्यावर ठाम आहेत अशा स्थितीत आज सरकारची भूमिका काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे मुंबईत गणेश उत्सव सुरू असताना जरांगे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यावर संपूर्ण मुंबईकर नाराज आहेत त्यामुळे जर मुंबईत मराठा आंदोलकांनी काही अतिरेक करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईकर रस्त्यावर उतरतील आणि त्यातून मोठ्या संघर्ष होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की माझी मराठा आणि ओबीसी समाजाला विनंती आहे. शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. कुणावर अन्याय करुन कुणाला देण्याचा प्रश्न नाही, दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं की आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. तसंच मराठा समाजाचे सगळे आम्हीच सोडवले आहेत. सांगावं इतर कुणी सोडवलेत? मी मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रश्न सुटले आणि आम्हीच सोडवणार आहोत. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूर मध्ये ओबीसी महासंघाची बैठक झाली या बैठकीला ओबीसींचे सर्व नेते उपस्थित होते या बैठकीत ओबीसींकडून साखळी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच सरकारने जरांगेच्या दबावाला बळी पडून जर काही चुकीचा निर्णय घेतला तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल आणि आपल्या हक्काचे रक्षण करेल असा इशारा ओबीसी ने दिलेला आहे
मराठा आरक्षणासाठी आज मुंबई पर्यंत आलेल्या आंदोलकांना कसे रोखायचे याबाबत पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.पोलिसांनी केवळ ५ हजार आंदोलकांना आझाद मैदानापर्यंत येण्याचा, आणि सकाळी ९ ते ६ या वेळेतच एक दिवसाचे अनुदान करण्याची परवानगी दिली आहे. तर जरांगे आमरण उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
