शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी पत्रकार संघात रंगीत तालीम
मुंबई : चौवीस तास बातम्यांच्या धावपळीत वावरणाऱ्या पत्रकारांच्या मनात दडलेली संवेदनशीलता, कलात्मकता आणि सृजनशीलता यांना रंगभूमीवर व्यासपीठ मिळावे, या हेतूने मुंबई मराठी पत्रकार संघाने यंदा प्रथमच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
राज्य नाट्य स्पर्धेसाठी सादर होणाऱ्या “निष्पाप” या दोन अंकी नाटकाची पहिली रंगीत तालीम शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी, पत्रकारांकडून, पत्रकारांच्या रंगभूमीचा नवा प्रवास! नाटकाविषयीचा उत्साह आणि पत्रकारांच्या सर्जनशीलतेचं कौतुक करायला येताय ना? यायचंच आहे!!
✦ नाटक : “निष्पाप”
लेखक : प्रा. दिलीप परदेशी
दिग्दर्शक : गुरुदत्त लाड
निर्माते : संदीप चव्हाण, अध्यक्ष – मुंबई मराठी पत्रकार संघ
✦ कलाकार
• मेजर विश्वनाथ – देवदास मटाले
• गौरी – स्वाती घोसाळकर
• कक्कड – प्रशांत चिळे
• शेखर – सिद्धेश शिगवण
• सुमती – रश्मी महांबरे
• रामू – सुरेश ठुकरूल
• चिंतामणी – गुरुदत्त लाड
✦ तांत्रिक विभाग
• नेपथ्य : प्रदीप पाटील
• रंगभूषा : शरद सावंत
• पार्श्वसंगीत : नंदलाल रेळे
• प्रकाश योजना : संजय तोडणकर
• रंगमंच व्यवस्था : सुरेश ठुकरूल / प्रदीप पाटील
• छायाचित्रण व सजावट : प्रवीण साळकर, संतोष नागवेकर
• रंगमंच सहाय्य : राजेश माळकर

