मुंबई- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्न रुग्णालय मध्ये मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या डॉक्टर खालीद अंसारी हे मुंबई महापालिका हिंदू हृदयसम्राट दवाखान्यामध्ये तीन वर्षापासून कार्यरत असल्याचे उघडकीस आले . दोन्ही रुग्णालय कडून पगार घेत सरकारी नियम पायदळी तूडवत असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2024 मध्ये सरकारी रुग्णालय सहाय्यक वैद्यकीय अधिकारी म्हणून कायम नियुक्ती झाली कायम असलेला डॉक्टर खाजगी तसेच अन्यत्र कोठेही रुग्णसेवा देऊ शकत नाही असा नियम आहे. मात्र 2023 पासून सप्टेंबर 2025 पर्यंत हे डॉक्टर मुंबई महापालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील आपला दवाखाना येथे कार्यरत होते .या कालावधीत त्यांना पालिकेकडून 34 लाख रुपयाचे मानधन मिळाले. राज्य सरकारच्या रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर आपला दवाखाना येथील सेनेचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र सरकारी नियम धाबयावर बसवत दोन्ही ठिकाणी सेवा कायम ठेवण्याचे समोर आले.
सरकारी रुग्णालयातील नियम माहिती नसल्याने दोन्ही ठिकाणी कामे केली मात्र नियम समजतात सप्टेंबर मध्ये महापालिकेच्या आपल्या दवाखाना या ठिकाणी राजीनामा दिल्याचे अन्सारी यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासन या प्रकरणावर चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले.
या प्रकाराने आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. महापालिकेच्या आरोग्य सेवा विभागात असे एकाच वेळी दोन नोकऱ्या करणारे किती महाभाग डॉक्टर कर्मचारी आहेत याचे शोध घेण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त यावर गांभीर्याने दखल घेऊन या महाभागाने शोधून त्याच्यावर कारवाई करतील.

