पाटणा/बिहारचा बाहुबली कोन होणार? आता याची चर्चा सुरू झाली आहेय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपलं आहे. उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे. आता बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याची चर्चा रंगली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच असाउद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनेही बिहारच्या निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. पण, यंदा ओवेसींच्या हातात ‘भोपळा’ लागण्याची चिन्ह आहे.बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये असादुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन एम आय एम पक्षाने तब्बल ३५ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे. डीव्ही रिसर्च नावाच्या संस्थेचा एक्झिट पोल समोर आला आहे. या एक्झिट पोलमध्ये बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार असा अंदाज वर्तवला आहे. एनडीएला १३७ ते १५२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर महागठबंधनला ८३ ते ९८ जागा मिळतील., तर जनसुराज पक्षाला २ ते ४ आमि ओवैसी यांच्या पक्षाला 0 ते २ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

