विधानसभा निवडणुकीत १६० जागा मिळवून देण्याची आम्हाला ऑफर होती – शरद पवार यांचा गौप्यस्फोट
मुंबई – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी केल्याचं म्हटलं आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही सर्वात मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत १६० जागा निवडून आणण्याची गॅरंटी २ जणांनी मला भेटून दिली होती असं पवारांनी म्हटलं. मात्र पवारांच्या या विधानावर भाजपानेही पलटवार केला…
