महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! ३१ हजार रुपये बोनस
मुंबई : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी आज, गुरुवार १६ ऑक्टोबर २०२५रोजी दीपावली २०२५ निमित्त कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत बोनस जाहीर केला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तब्बल ३१००० रुपये बोनस मिळणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.महापालिका आयुक्त भूषण…
